नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर : आज हिमायतनगर येथील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ उपोषण सोडवण्यासाठी केली निवेदनाद्वारे केली मागणी सविस्तर असे कि आपणास निवेदन देण्यात येते कि मागील सात दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत, परंतु अद्यापही शासनाने त्याची दखल घेतली नसून सबब त्यांची तब्बेत अधिकाधिक खालावत चालली आहे म्हणून शासनाच्या या आडमुठे धोरणांच्या विरोधात आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड शहरासह १६ ही तालुक्यात हिमायतनगर तालुक्यासह कडकडीत बंद पुकारून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे समाजाच्या पुढील मागण्यांचा विचार करून तात्काळ मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य कराव्या, जरांगे पाटलांचे उपोषण सोडवून सकल मराठा समाजाला न्याय देऊन आमच्या हे मागण्या मान्य करा सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.हैद्राबाद सह सातारा,बाॅम्बे गव्हर्नमेंटचे गैझेट लागु करावे.अंतरवाली सराटी सह संपुर्ण महाराष्ट्रातील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.राज्यभरात कुणबी नोंदणी तपासुन, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे काम हे अतिशय मंदगतीने चालु आहे त्याला गती देण्याचं काम शासकीय यंत्रणामार्फत करण्यात यावे.ई.ड्ब्लु.एस.सह एस. ई.बी.सी. आणि कुणबी हे तिनही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत.१ जुन २००४ च्या कायद्यात सुधारणा करुन मराठा व कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करावा.असे हिमायतनगर सखल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज करण्यात आली आहे.