मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :- अनेकजण लांब लांब गोष्टी फेका साठी यूट्यूब चा वापर करतात मात्र आपल्या जिद्द व चिकाटीने यूट्यूब चा वापर एकाने लांब गोळा फेकण्यासाठी केला आहे, स्थानिक मंगलमूर्ती नगर चांदुर रेल्वे येथील विद्यार्थी आणि अष्टपैलू खेळाडू रेवन शंकरराव क्षीरसागर याने नुकतेच रायगड येथे झालेल्या “महाराष्ट्र राज्य 23 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024” मध्ये लांब गोळा फेकून गोळा फेक या खेळामध्ये रेवण याने कास्यपदक पटकावलेले आहे.अतिशय सामान्य आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये रेवन याने जिद्द,चिकाटी तसेच मेहनतीने या गोळा फेक खेळामध्ये प्राविण्य मिळवलेले आहे, रेवन च्या घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असून रेवनचे आई-वडील गेल्या पंधरा-वीस वर्षापासून आपली उपजीविका प्रेस चे काम करून करत आहे, काल पर्यंत कोणालाही माहीत नसलेल्या रेवन ला मैदानावरील पोलीस भरतीची तयारी करणारे मुलांकडून गोळा फेक या खेळाची माहिती झाली त्यांनतर आपणही ते करू शकतो हे आत्मविश्वास मिळवल्यावर रेवन ने यूट्यूब वर गोळा फेकचे तांत्रिक ज्ञान मिळविले, घराच्या मागेच खुल्या जागेवर स्वतःपुरते मैदान तयार करून व यूट्यूब ला गुरू मानून त्याने गोळा फेक ची तालीम सुरू केल्याचे त्याने सांगितले, या खेळ प्रकारात आवड निर्माण झाल्यावर त्याने अमरावती जाऊन याची माहिती मिळविली व गोळाफेक असोसिएशनशी संपर्क साधून विविध स्पर्धेत त्याने भाग घेणे सुरू केले अशातच रायगड येथे जिओ इन्स्टिट्यूट द्वारे आयोजित 23 वर्षाखालील राज्यस्तरीय गोळाफेक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये तो सहभागी झाला संपूर्ण राज्यातुन आलेल्या स्पर्धकांमधून रेवन ने तृतीय क्रमांक पटकावत रोप्य पदक मिळविले. आज अनेक श्रीमंत पालक आपल्या पाल्यांना लाखो रुपये खर्च करून विविध खेळात उतरवितात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करतात महागडे साहित्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देतात परंतु एखादया विद्यार्थ्यांत जिद्द चिकाटी व स्वयंप्रेरणा असल्यास त्याला यश मिळविण्यासाठी कसल्याही सुवेधे ची गरज पडत नाही याचे उदाहरण रेवन ने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिल्याच्या प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या.राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरूकॉलनीतील पोलीस भरतीची तयारी करतांना मुलांना गोळा फेक करतांना आपण पाहिले आणि मीही गोळा फेकून पाहिला तो बऱ्याच लांब गेल्याने मित्रांनी माझे कौतुक केले होते त्यावरून यूट्यूब च्या माध्यमातून माहिती घेत मी महावीद्यालयीन स्पर्धेत यश प्राप्त केले व त्यानंतर फेडरेशन च्या माध्यमातून ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविता आले तर आता यानंतर राष्ट्रीय स्पर्धेकरिता तयारी करत असल्याची माहिती दिली. असे असले तरी घरच्या परिस्थिती मुळे रेवनला स्वतःचा हक्काचा गोळाही घेता आला नाही.