शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी – दि.19.सॅनरो एज्युक्युअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित क्युरियस किड्स प्री स्कूल आणि फिनिश एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार दिल्ली येथे एका कॉन्फरेन्स दरम्यान झाला. या करारानुसार क्युरियस किड्स प्री स्कूलला जगातील सर्वोत्तम फिनिश एज्युकेशन चे मान्यता प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, त्याद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण व होमवर्क टास्क प्रदान केले जातील. ऑनलाइन प्रशिक्षण व्हिडिओद्वारे सादरिकरण केले जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने शिक्षण दिले जाईल.यासोबतच, पालक आणि शिक्षकांना फिनलँडच्या शिक्षण पद्धतीवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे शिक्षकां च्या अध्यापन कौश ल्यांमध्ये सुधारणा होईल. या करारामुळे क्युरियस किड्स प्री स्कूलला फिनलँडचे करिक्युलम देखील उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल.या महत्त्वपूर्ण कराराबाबत सॅनरो एज्युक्युअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित क्युरियस किड्स प्री स्कूलचे चेअरमन डॉ. संजय रोडगे यांनी माहिती दिली. त्यांनी दिल्ली तील एका विशेष कॉन्फरन्स दरम्यान या करारावर स्वाक्षरी केली आहे.