प्रकाश केदारे जिल्हा उप प्रतिनिधी, परभणी
दि.२३ सप्टेंबर रस्ता ओलांडत असताना ७४ वर्षीय वृद्ध अरविंद यशवंतराव वाघमारे हे रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या एम एच २६ एच ६८४८ या क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगात धडक दिली. यात अरविंद वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की अरविंद वाघमारे हे वसमत रोडवर एका पेट्रोल पंपा समोरून रस्ता ओलांडताना ट्रक पूर्णतः त्यांच्या अंगावरुन गेल्यामुळे चेहरा आणि अर्ध शरीर छिन्न विच्छीन्न झालेले होते. या अपघातात अरविंद वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतातपो.नी. शरद मोरे ,सपो. नी बी आर बंदखडके, पो.हे .का .अनिल वाकळे अनिल कटारे , गोरे यांनी घटनास्थळी गाव घेतली मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासनी नंतर त्यांना मृत घोषि केले. या संदर्भात नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.