रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
नटराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था वारखेड तेल्हारा अंतर्गत नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्य स्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार 2024 चे आयोजन करण्या त आले होते.यामध्ये शिक्षण, कलावंत,आरोग्य,समाजसेवा,पोलीस, पत्रकारिता, आदर्श शाळा,अंगणवाडी सेविका यांना राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार 2024 चे जाहीर केले होते. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन अकोट चे हिंम्मत दौलतराव दंदी यांना समाजसेवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहेत.