आरक्षीत जागा सर्वसाधारण प्रवर्गाला.
सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २२ सप्टेंबर २०४ महाराष्ट्र मध्ये शिक्षण विभागात एससी एसटी ओबीसी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक आरक्षणामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका भरतीमध्ये सर्वच आरक्षणाच्या जागा पात्र शिक्षक उपलब्ध असतानाही त्रिमूर्ती सरकारने आरक्षणाच्या जागा सर्वसाधारण वर्गाला वर्ग करून भरती केल्याचा पुराव्यासहित आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली असून संबंधित जबाबदार अधिकारी असेल त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या मराठी माध्यमातून पदवी तर शिक्षकावर अन्याय होत असून आरक्षणासंदर्भात सर्व स्तरावर उल्लंगन शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर झालेले आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील प्रकल्प समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण गटासाठी रूपांतरित केलेले पदे प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाचे उपलब्ध करून तात्काळ शासनाने कारवाई करावी. कारण शासनाने अनेक जीआर काढल्यामुळे शिक्षण खात्यामध्ये प्रचंड मराठी माध्यमातील शिक्षकावर अन्याय होतोय व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य दि.२५/२/२०२४ ला पवित्र पोर्टल वर दिसत आहे. शिक्षक भरती मध्ये आरक्षणाच्या सर्वच उमेदवारावर अन्याय तर केला असून ज्यांना सेवेत समाविष्ट करून घेतलेले आहे, अशा अनेक उमेदवारांना मुलाखतीला पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. ही गंभीर बाब आहे .तसे सर्व याद्यांमध्ये उमेदवाराचे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रवर्गात यादीमध्ये समाविष्ट केलेले प्रसिद्ध नावे झालेली दिसतात ,अनेक पात्र उमेदवाराला संधी न दिल्यामुळे अन्याय झालेला आहे संपूर्ण भरती मध्ये महा घोटाळ्याची शासन स्तरावर तात्काळ चौकशी करून जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई नियमानुसार करण्यात यावी. सर्वच एससी एसटी ओबीसी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक आरक्षणामध्ये उमेदवार उपलब्ध असतानाही भरती केली नाही तरी खुल्या प्रवर्गातील रूपांतरित केलेली पदे तात्काळ पूर्व प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची प्रवर्गनिहाय आरक्षण निहाय प्रत्यक्ष यादी लावून त्यांना सेवेत नियमानुसार घेण्याचे निर्देश व्हावेत तसेच पवित्र पोर्टलच्या पेज दोन मध्ये सर्वांचे आरक्षण, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक यांच्या रूपांतरित केलेल्या जागा त्या प्रवर्गाला पुन्हा देऊन त्यांच्यावर झालेल्या भरती मधील अन्याय दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करून शासन कडून तात्काळ अहवाल स्वयं स्पष्ट अभिप्रायसह सादर करावा असे आदेश देण्यात आल्याची माहिती माहिती काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी दिली.