दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा : येथील पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात पुनमताई महाजन यांचे 24 सप्टेंबरला व्याख्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली. संधी व सहभाग-2047 या विषयावर मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी हॉल येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानाला शहादा तळोदा मतदार संघातील युवा वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.