जलील शेख तालुका प्रतिनिधी,पाथरी
रामगिरी महाराजाला अटक करा, वक्फ बिल मागे घ्या आणि मुस्लिमांना आरक्षण द्या या प्रमुख महत्त्वाच्या प्रश्नावर राज्य सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम अल्पसंख्याक बांधवांना तिरंगा यात्रेची हाक देण्यात आली होती. या हाकेला साथ देत सर्वात जास्त शेकडो वाहने व पाथरीचे हजारो मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. सदर तिरंगा यात्रा आज २३ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा संकल्प घेत देशभक्त मुस्लिम बांधवांनी तिरंगा हातात उचलला आहे.समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक बांधिलकी व धार्मिक कर्तव्य म्हणून मुंबईला जाणाऱ्या अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात सोय मा.आ बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने करण्यात आली आहे. एकूण २२५ वाहनांचा यामध्ये समावेश आहे.या वाहनांना आज २२ सप्टेंबर रोजी बाबाजानी दुर्रानी यांनी हिरवा झेंडा दाखवत मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचा इशारा दिला.या वेळी अल्पसंख्यांक बांधवात मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराला अटक करा,मुस्लिम द्वेष नजरेसमोर मांडलेले वक्फ बिल मागे घ्या व मुस्लिमांना शैक्षणिक व आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी आरक्षण द्या इत्यादी मागण्या मांडण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रश्न मार्गी न लागल्यास निश्चितच याचा फटका येत्या विधानसभेत महायुती सरकारला बसू शकतो.