महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.21- भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्राची तीसरी शिक्षण परिषद साई कॉन्व्हेंट कुणाडा येथे नुकतीच थाटात पार पडली. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डॉ. प्रकाशजी महाकाळकर साहेब व संवर्ग विकास अधिकारी मा. आशुतोष सपकाळ साहेब यांच्या प्रेरणेने ढोरवासा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद साई कॉन्व्हेंट कुणाडा येथे नुकतीच पार पडली. परिषदेला अध्यक्ष म्हणून मा. डॉ प्रकाशजी महाकाळकर साहेब तर उदघाटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी कु. कल्पना सिद्धमशेट्टीवर मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून श्री जलील शेख साहेब (शि. वि. अ.), अतुल बडकेलवार सर, प्राचार्य साई कॉन्व्हेंट कुणाडा, भारतजी गायकवाड सर, केंद्रप्रमुख ढोरवासा लाभले होते यात तज्ञ मार्गदर्शक म्हणून आशिष देहारकर सर (इंग्रजी तज्ञ),विशाल दहाटे सर (विनोबा अँप), दिनकर गेडाम सर व कुमारी मनीषा चन्नावार मॅडम यांनी आजच्या वाढत्या समस्येला अनुसरून पोस्को कायदा, लैंगिक अत्याचार, बालविवाह ,सायबर गुन्हा या विषयावर उत्तम अशी माहिती दिली.परिषदेच्या पहिल्या सत्रात माता सावित्रीबाई फुले व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधिवत सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे शब्दसुमनांनी, सुमनांनी व स्वागतगीतांनी स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये श्री गायकवाड सर यांनी प्याशीव विद्यार्थ्यांऐवजी ऍक्टिव्ह विद्यार्थी तैयार करा. शिक्षकांनी पळवाटा काढू नये कारण समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात कष्टाळू, कसा टाळू आणि काय टाळू. आपल्याला कोठे राहायचे आहे हे ठरवायला हवे.परिश्रम, कष्ट याशिवाय उपाय नाही.यशस्वी व्यक्ती परिश्रमांनी आपली ओळख तैयार करत असतात तुम्हाला पण आपली ओळख तयार करायला हवी अध्यक्षीय भाषणात श्री डॉ प्रकाशजी महाकाळकर साहेब यांनी एकविसाव्या शतकातील आव्हान पेलणारी मुले तयार करून मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षकांना आता परिपूर्ण होण्याची गरज आहे, मुलांच्या पटसंख्येवर आपले भविष्य ठरलेले आहे त्यासाठी गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. शासनाचे आलेले परिपत्रक वेळोवेळी तपासून त्याची अंमलबजावनी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या मध्यांतरात केंद्रातील आदर्श शिक्षकांना शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात जिल्हा परिषद शाळा गवराळा च्या मेघा शेंडे मॅडम, चारगाव च्या वंदना बोढे मॅडम, कुणाडा च्या ज्योती नाकाडे मॅडम, देऊरवाडा चे ह्युमेन्द्र बोरकर सर, ढोरवासा चे अजय गाडगे सर, तेलवासा च्या मनीषा चन्नावार मॅडम घोनाड च्या त्रिरत्ना चांदेकर मॅडम, गवराळा च्या उर्मिला बोंडे मॅडम, चिरादेवी चे राजू चौधरी सर, कुणाडा च्या वनिता बलकी मॅडम, चिरादेवी चे राजेंद्र वागदरकर सर, मुरसा चे उपेंद्र दमके सर, पिपरी चे संजय मासळकर सर, घोनाड चे सुरेश पेटकर सर, चिरादेवी चे अजय मुसळे सर, मुरसा च्या समिता घाटे मॅडम, कोच्ची च्या माधुरी चिंचोलकर मॅडम, ढोरवासा चे दिनकर गेडाम सर, चारगाव चे वसंत जांभुळे सर, कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य श्री दामोदर दोहतरे सर, डॉ आंबेडकर विद्यालय मुरसा चे मुख्याध्यापक श्री शंकर पुंजेकर सर, साई कॉन्व्हेंट कुणाडा चे प्राचार्य अतुल बडकेलवार सर अश्या बावीस शिक्षकांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता बलकी मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत जांभुळकर सर यांनी केले.