जय वारकरी ग्रामीण प्रतिनिधी करंजी
रोड करंजी येथून अवघ्या 2 कि अंतरावर असलेल्या कोठोडा येथील. संजय काळे हे नित्य नेमाने दररोज आपल्या शेतामध्ये सकाळी मशागती व गाईचे दूध काढण्याकरिता गेले असता त्यांना शेतातील जाणवरंचा गोठा हा जळलेल्या अवस्तेत दिसला. जवळ जाऊन बघताच त्यातील संपूर्ण शेती मशागतिचे अवजार कुटार व त्यातील दुधाळ जाणवरे 3 गाई मृत अवस्तेत व 2 बैल 1कालवड व 1मैस किरकोळ गंभीर जखमी अवस्तेत आढळले. त्यानंतर त्यांनी लगेच पांढरकवडा पोलिस्टेशनं ला या संपूर्ण घटनेची भ्रम ध्वनी द्वारे माहिती दिल्ली, तरी या माहितीच्या आधारावर पांढरकवडा पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी दखल झाले त्या नंतर पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री झांबरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उमेश कुंमरे व पो. हे कॉ. राठोड हे तपास करीत आहे व या घटनेने संपूर्ण करंजी परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.