अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ईद-ए-मिलादुनबीच्या शुभ मुहूर्तावर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त झाकीर मामू मित्र मंडळ, ढाणकी यांनी मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप करून मानवता व बंधुतेचा आदर्श संदेश दिला. पैगंबर साहेबांच्या प्रेरक विचारांमध्ये असे म्हटले आहे की, सर्वप्रथम आपल्या शेजाऱ्याची काळजी घ्या. जर तुमचा शेजारी भुकेला असेल तर तुम्ही कितीही प्रार्थना केल्या तरी सर्व काही निघून जाईल. सर्व प्रथम, शेजाऱ्याला उपासमार होण्यापासून वाचवण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे गरीब आणि अनाथांना मदत करून हा संदेश ते नेहमी देत असत.कोणत्याही माणसाच्या जीवनात माणुसकीपेक्षा महत्त्वाचे दुसरे काही नाही. सर्वप्रथम मानव धर्माचे पालन करा. हजरत मोहम्मद पैगंबर S.A.W. समाजसेवे अंतर्गत सांगितले. त्यांच्या या महान विचारांनी प्रेरित होऊन झाकीर मामू मित्र मंडळाच्या तरुणांनी बिटरगावचे पोलीस स्टेशन ठाणेदार प्रेम केदार व उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांच्या हस्ते मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप करून आपले मानवतावादी कर्तव्य खऱ्या अर्थाने पार पाडले. प्रिय प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांची जयंती साजरी झाली, झाकीर मामू मित्र मंडळ ढाणकी यांच्या या सौहार्दपूर्ण कार्याचे सर्वांनी कौतुक केले. मुकबधीर यांच्या विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप करताना बिटरगावचे पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेम केदार, उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे, खालिद भाई, वकील सलीम सौदागर, दीपक रावते, इर्शाद सर, जुबेर पठाण, शेख मोईन शेरू भाई मेकॅनिक, हारून भाई, शकील अहमद ईत्यादी व झाकीर मामू मित्र सर्व सदस्य उपस्थित होते.