विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, शेतकऱ्याचे कैवारी सिल्लोड सोयगाव चे ज्येष्ठ नेते श्री.ठगणराव भागवत पाटील यांनी आपल्या मूळ भायगाव या गावी गावकऱ्या समावेत पोळा साजरा केला, पोळ्यानिमित्त बैलांना सजावून भागवत पाटलांनी त्यांचे पूजन केले भर पावसात भायगाव आपल्या गावी पोळा साजरा करण्यात आला ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज जरी बैलांची संख्या कमी होत असली तरी भागवत पाटलाच्या भायगाव गावी मात्र शेतकऱ्यांनी बैल जोड्या जपल्या आहेत दरवर्षी ठगणराव भागवत पाटील हे त्यांच्या मूळ गावी पोळा साजरा करतात गावकऱ्यांना भेटतात त्यांची आसतेने चौकशी करतात यावर्षी ही त्यांनी आपल्या भायगाव गावी पोळा साजरा करून शेतकऱ्यांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत,