जलील शेख तालुका प्रतिनिधी पाथरी
राष्ट्रकुल संसदीय मंडळ ,महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२० – २१ करिता देण्यात येणारा “उत्कृष्ट भाषण पुरस्कार” मा.राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते आज विधिमंडळ मुंबई येथे स्वीकारला. एक वेळा विधानसभा आणि दोन वेळा विधान परिषदेचा आमदार म्हणून आमदार म्हणून पाथरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जनतेने मला काम करण्याची संधी दिली,राज्याच्या दोन्ही सभागृहात मला पाठवले.आजचा पुरस्कार हा मतदारसंघातील जनतेचा पुरस्कार आहे.आमदार म्हणून सभागृहात लोकांच्या न्यायासाठी,लोकांच्या मूलभूत सुविधांसाठी , शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकास कामांसाठी बोलता आले.लक्षवेधीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेऊ शकलो.आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे हा पुरस्कार मिळाला.असेही शेवटी माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.