बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : शिवसेना ( उ बा ठा ) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्या पुढाकारातुन शेतकरी सेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदी माजी सरपंच गणेश गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. शिव सर्वेक्षण अभियानांर्गत हिंगोली येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव , मनोज जामसुतकर , खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील , उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे पाटील , माजी आमदार संतोष टारफे , उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे पाटील, अजित मगर, शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. माजी सरपंच गणेश गावंडे एकनिष्ठ शिवसैनिक असल्याने अखेर त्यांना हे पद देऊन सन्मान करण्यात आला.