संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी,घाटंजी
घाटंजी:- तालुक्यातील पारवा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया या शाखेने अनेक महीलांच्या खात्याला होल्ड लावल्याने सदर महीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैस्यापासून या महिला वंचीत राहील्या आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्याही प्रकारच्या कर्जात कपात करू नये असे आदेश दिले असतांना पारवा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेने आपले मनमानी कारभार करीत असल्याचे महीला सांगत आहे.पारवा गावातील अनेक महीला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलण्यासाठी पारवा शाखेत गेले असता तुमच्या कडे बचत गटाचे कर्ज आहे ते भरा अन्यता तो पर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार नाही असे बॅंक कर्मचारी यांनी महीलांना सांगितले आहे. यामुळे महीलांनी बॅंकेच्या विरोधात जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहेत.या तक्रारीवर चंदा बोमीनवार, सिमा जाधव,गंगाबाई पसलावार, सोनू फसलावार, ताराबाई जाधव, अपर्णा भोयर, धुरपता मोहीते, सह अनेक महीलांच्या स्वाक्ष-या करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .