मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण.बदलापूर येथील महिला पत्रकारा विषयी अपशब्दवापरणाऱ्या वामन म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाअसला तरीही तो मोकाट फिरत असून, त्याला तात्काळ अटककरून महिला पत्रकार भगिनीस न्याय मिळावा यासाठी बिडकिन पत्रकार संघाच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी बिडकीन पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. बदलापूर घटनेच्या वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना शिंदे गटाचा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे याने तु अशा बातम्या देत आहेस की जणू काही अत्याचार आपल्यावरच झाला आहे, असे अपशब्द वापरले. अशा अप शब्दांमुळे पत्रकार भगीनीस मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यास तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी बिडकिन पत्रकार संघाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकार नंदकुमार वैद्य, विजय शेजुळ, हसन चाऊस, रविंद्र गायकवाड, सुनील बदर, अरुण देविदास, दिलीप जोशी, अली ईनामदार, अलिम शेख, सऊद हबीब, किरण औटी यांच्या सह इतर पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.