महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी ,भद्रावती
भद्रावती दि.२३:- शहरातील मुख्य मारर्गालयात असलेल्यां पेट्रोल समोरील अहतेशाम अली बिल्डिंग येथे आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी गूरूवार ला वरोरा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अहतेशाम अली यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे ऊदघाटन स्थानिक गूरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष केशव महाराज मेश्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.भद्रावती तालुक्यातील ग्रामिन व शहरी क्षेत्रातील जनतेनी आपल्या समस्या व मागण्या घेऊन जनसंपर्क कार्यालयात संपक साधावा सर्वसामान्य जनतेच्या समस्या व मागण्या मागी लावण्याचा माझ्या परिने प्रामाणिक प्रयत्न करेन यापुढे सुध्दा जनतेच्या सेवेत तत्पर सदैव तयार राहाणार असल्याचे वरोरा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अहतेशाम अली यांनी म्हटले. या प्रसंगी वृदांवन सभागृहात आयोजित संभारंभात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात गुडांवार,प्रशात शिंदे,धमेंद्र हवेलीकर,विनोद पांढरे,हाजी जावेद शेख,आशिष ठाकरे,संदिप विधाते,धनराज पायघन,राजू सातपूते,प्रणिता शिंदे,लता भोयर,मधुकर ठाकरे अतिश बोरा, हाजी शहिद अली, तुळशीराम श्रीरामे,सूधाकर रोहनकर, विजय वानखेडे, रवि पवार,सत्तार शेख,यांच्यासह ईतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.