स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे आढळून आले तीन डेंग्यू रुग्ण उमरखेड तालुक्यात आदर्श गाव पिंपळदरी यथे डेंगू सदृश तापाचे रुग्ण वाढले असून एका 4 वर्षाच्या मुलीला डेंग्यूची लागण झाली होती, सदर मुलीवर नांदेड येथील बालरोगतज्ज्ञ डॉ,रेंगे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी परतली आहे,तर शेंबाळपिंप्री येथील बालरोगतज्ज्ञ डॉ,अजित चंदेल यांच्या रुग्णालयात पिंपळदरी येथील डेंगू पॉझिटिव्ह दोन रुग्ण उपचार घेत आहेत,मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयात सुद्धा मोठ्या प्रमाणात मुलांना उपचारासाठी आणले जात आहे, यात साधारणता सर्दी ,ताप, खोकला ही लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णालयात तापाच्या औषध देऊन उपचार केले जात आहेत. त्यानंतरही आजार कमी न झाल्यास डेंग्यू तसेच टायफाईडची चाचणी केली जात आहे काही मुलांना डेंग्यूची लक्षणे आढळल्याने ही चिंता वाढली आहे.त्यामुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, यारखे आजार झाल्यावर त्वरित डॉक्टरांच्या सल्याने उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी विशाल दवणे यांनी केले आहे,कोट-:मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले होते, पण ग्रामपंचायतला असलेली धूर फवारणी मशीन वर्षभरा पासून बंद आहे,गेल्या वर्षी वानेगाव येथून मशीन आणून दूर फवारणी केली होती, त्यामुळे लवकरच वानेगाव येथून मशीन आणून गावात धूर फवारणी करण्यात येईल,गावात ज्या ठिकाणी सांडपाणी साचते त्याचे सुद्धा योग्य नियोजन करण्यात येईल व तसेच गावातील रस्त्यावर ज्यांचे सांडपाणी येते की ज्या पाण्यामुळे गावकऱ्यांना त्रास होत आहे अशा लोकांना पण सक्त सूचना देऊन रस्त्यावर येणारे सांडपाणी बंद करण्यात येईल,गावकऱ्यांनी सुद्धा आपला परिसर स्वच्छ ठेऊन लहान मुलांची काळजी घ्यावी.