शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
जिल्हास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.सेलू :क्रीडा व युवक सेवा संचनालय म रा पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हा स्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेत श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला सेलूच्या विद्या र्थिनीनी घवघवीत यश मिळवले असून प्रशालेच्या तीन विध्यार्थीनीची हिंगोली येथे होणाऱ्या शालेय विभागीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दि 22 ऑगस्ट रोजी परभणी येथील क्रीडा संकुल मध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या सहा विधार्थिनी सह भागी झाल्या होत्या त्या पैकी कु स्नेहल कांबळे, कु अक्षरा गायकवाड, व कु भक्ती आघाव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय प्राप्त केल्यामुळे या तीन ही विद्यार्थिनी हिंगोली येथे होणाऱ्या विभागीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.या खेळाडूंना प्रशालेचे किशोर ढोके व राजेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.विद्या र्थिनीच्या या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया,उपाध्यक्ष डी के देशपांडे, सचिव डॉ व्ही के कोठेकर, सह सचिव जयप्रकाशजी बिहाणी,शालेय समिती चे अध्यक्ष नंदकिशोर जी बाहेती, प्रशालेच्या मुख्याध्यापिका एन डी पाटील, उपमुख्याध्या पक .डी.बी. घोगरे, पर्यवेक्षक आर. एस. मोगल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.