शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
अखिल भारतीय विभागीय स्तरावर विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रथम.सेलू : दि. 22 ऑगस्ट श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु. तनिष्का अनंत तेलभरे वर्ग 9 वी हिने अखिल भारतीय मराठवाडा विभाग स्तरीय विज्ञान मेळा व्यात प्रथम क्रमांक मिळवला.अखिल भारतीय विभागस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील निवड झालेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सुरुवातीला विद्यार्थ्यांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेण्यात आली, तसेच विद्या र्थ्यांचे भाषण कौशल्य, पावर पॉइंट प्रेझेंटेशन व परीक्षकांनी विद्या र्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे विभागीय विज्ञान मेळाव्यासाठी मराठ वाडा विभागातुन दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तरी कुमारी तनिष्का अनंत तेलभरे या विद्यार्थिनीने सर्व कसोट्यावर उत्तम मार्क्स मिळवून अप्र तिम प्रदर्शन केले व सर्वांची मने जिंकली. आता राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्या साठी निवड झाली आहे. यासाठी विज्ञान शिक्षक नारायण चौरे यांनी मार्गदर्शन केले व कु गायत्री पावडे वर्ग 9 वी हिने सहकार्य केले.या यशासाठी श्रीराम प्रति ष्ठान सेलू संस्थेचे संस्था पक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सवि ता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर, शाळेतील शिक्षक यांनी अभि नंदन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.