गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती नांदुरा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ वडनेर भोलजी अंतर्गत मौजे विटाळी येथे भव्य पशुवंध्यत्व निवारण शिबीर,जंतनिर्मुलन,गोचीड गोमाश्या निर्मुलन, तोंड खुरी पायखुरी लसीकरण शिबीर तसेच शेतकरी व पशुपालक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अमितकुमार दुबे साहेब तसेच जिल्हा दुग्ध विकास अधिकारी डॉ.दिवाकर काळे साहेब व पशुधन विकास अधिकारी(वि) पंचायत समिती,नांदुरा डॉ.विष्णु दळवी साहेब यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले, प्रमुख उपस्थिती मधे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष,पोलिस पाटील, कृषिसखी, बचत गट सीआरपी तसेच एनडीडीबी च्या डॉ. प्रियंका वर्मा मॅडम,तसेच आय एन टी ए एस चे मॅनेजर श्री.घाडगे साहेब हे उपस्थित होते,पशुसंवर्धन विभागातील श्री.ए.बी.कांबळे,स.प.वि.अ.वडनेर भोलजी,श्री.सचिन साठे पशुधन पर्यवेक्षक,श्री.संदीप वाणी,पशुधन पर्यवेक्षक,श्री.विजय माळी,परिचर तसेच सर्व पशुसेवक/पशुसखी यांचे सहकार्य लाभले,शिबिराकरिता मोठ्या प्रमाणात पशुपालक उपस्थित होते.शिबिरामध्ये एकूण २१७ जनावरांना विविध सुविधा दिल्या.