शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलूत सुसज्ज इनडोअर हॉलचे काम अंतिम टप्प्यात. सेलू :ऑलिम्पिक स्पर्धेत आपणं कमी पडलो असलो तरी आपल्याला पुढच्या स्पर्धेची तयारी गावं खेड्यापासून करावीच लागेल. खेळ संस्कृती गाव – खेड्यापासून तयार व्हावी यासाठी सेलूत खेळाडूसाठी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपल ब्ध होत आहेत याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले.नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिस रात खेळाडूसाठी इन डोअर क्रीडा हॉलचे काम प्रगतीपथावर आहे, त्याची पाहणी करण्यासाठी आ. मेघ ना बोर्डीकर यांनी केली. याप्रंसगी नूतन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस.एम. लोया, सचिव डॉ व्हि.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी,नंदकिशोर बाहेती, मकरंद दिग्रस कर, डाॅ. शरद कुलक र्णी,अँड श्रीकांत वाई कर, दिनकर वाघ,रविंद्र डासाळकर, कपिल फुलारी, मुख्याध्यापक संतोष पाटील, सुखा नंद बेडसुरे, के.के. देशपांडे, बी.डी. घोगरे,उपस्थित होते.या प्रसं गी बोलतांना आमदार मेघना बोर्डीकर म्हणा ल्या की, खेळ खेळणे हा निरोगी आणि तंदु रुस्त राहण्याचा,लोकां शी संवाद साधण्याचा आणि खूप आनंद घे ण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तथापि,पूर्ण लाभ मिळविण्यासाठी,आपणं नियमितपणे सराव करणे आवश्यक आहे – आणि नियमितपणे सराव करण्यास प्रवृत्त होण्यासाठी, त्यांनी अनुभवाचा पूर्ण आनंद घेतला पाहिजे. हे तेंव्हा च शक्य आहे जेव्हा ते त्यांचा आवडता खेळ आरामात आणि सुरक्षि ततेने, सोयीस्कर वेळी आणि ठिकाणी खेळू शकतील. जेव्हा लोक त्यांच्या आवडीचा को णताही खेळ कोणत्या ही अनुकूल वातावरणा त, वर्षाच्या कोणत्याही वेळी खेळू शकतात, या साठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिस रात होवू घातलेला इनडोअर हॉल नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचा लन गणेश माळवे, तर आभार प्रदर्शन अनिल रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कर ण्यासाठी प्रा.के.के. कदम, नागेश कान्हे कर, प्रशांत नाईक, बाळू बुधवंत, राजेश राठोड, आदींसह परीश्रम घेतले.








