मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी :बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कल मधील,हिप्परगा थडी.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,आठ वर्गावर,चार शिक्षक,व एक मुख्याध्यापक.विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम.प्रशासन याकडे लक्ष देतील का?असा पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही हिपरगा थडी,येथील केंद्रामध्ये पहिला नंबर आलेली शाळा आहे. तरी या शाळेला आठ वर्ग असून,या आठ वर्गासाठी फक्त चार शिक्षक,व एक मुख्याध्यापक आहेत. मुख्याध्यापक यांना कार्यालयीन कामकाज,असल्यामुळे ते फक्त कार्यालयांमध्येच असतात.व त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने,निवडणुकीचे कामे सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत.तरी चार शिक्षक,आठ वर्ग,कसे सांभाळतील त्यांच्यावर सुद्धा दडपण निर्माण होइल.आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा दडपण निर्माण होण्याची शक्यता आहे.तरी तरी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडे माननीय जिल्हा परिषद मुख्य अधिकारी,व गट विकास शिक्षण अधिकारी,यांनी लक्ष देतील का?असा सवाल नागरिक करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा याकडे संत गतीने पाहत आहे. हिप्परगा थडी या गावांमध्ये सर्वात गोरगरीब लोक,जास्त प्रमाणात अस्तित्वात आहेत.त्यांचेच मुलं या शाळेमध्ये शिकत असतात,तर या गोरगरिबांच्या मुलांना. शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम इथला प्रशासन करत आहे.तरीही प्रशासनाची खूप मोठी चूक आहे,तरी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी,यांनी ताबडतोब या शाळेला.शिक्षक देतील का?असा सुद्धा सवाल या ठिकाणी निर्माण होत.आहे जिल्हा परिषद प्रतिनिधी,असतील पंचायत समिती प्रतिनिधी असतील,ग्रामपंचायत प्रतिनिधी असतील,सर्वांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे काम सुरू केलेले आहेत,तरी सर्वांनी याकडे लक्ष द्यावे.आणि लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या, शिक्षणावर परिणाम होणार नाही.याची काळजी घेऊन ताबडतोब मध्ये,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी,येथे नवीन शिक्षकांची रुजू करावी.अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमध्ये होत आहे. प्रशासन लक्ष देईल का?मुख्य अधिकारी यांनी लक्ष देतील का?गट विकास अधिकारी यांनी लक्ष देतील का? व ग्रामपंचायत लक्ष देतील का? असा पालकांमध्ये संभ्रम निर्माण आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत.आहेत दैनिक अधिकारनामा प्रतिनिधी, यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील,मुख्याध्यापक श्री मुठेपोड सर यांच्याशी संवाद साधले.असता त्यांनी लेखी स्वरूपामध्ये गटविकास अधिकारी,यांना शाळेला शिक्षक द्यावी अशी विनंती अर्ज केलेली आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक श्री मुठेपोड सर यांनी सांगितलेले आहे.

