नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर ,डोलारी, वाळकेवाडी, बुरकुलवाडी, वडाचीवाडी, येथे युवा शिंदे सेना शाखेच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील कामारी, दुधड, वाळकेवाडी, अंदेगाव, पूर्व व पश्चिम येथे पुनर्वसित गावांत कोट्यवधींचा विकास निधी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकरांच्या प्रयत्नातून प्राप्त झाला आहे. त्या विकासकामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. डोल्हारी, पळसपूर, बुरकुलवाडी, वडाचीवाडी, वाळकेवाडी येथे युवा सेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठेवाड करजिंकर यांच्या प्रयत्नातून शाखा बांधणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत, असे यावेळी बाबुराव कदम कोहळीकरांनी सांगितले. यावेळी हदगाव तालुकाप्रमुख विवेक देशमुख, बबनराव कदम, संदेश पाटील हडसनीकर, शीतल भांगे, विजयकुमार वळसे पाटील, राजीव पाटील भोयर, बालाजी राठोड संतोष पाटील कदम डोलारी, पळसपुर शाखा प्रमुख कोंडीबा कदम, दत्ता कोमलवार , शामराव सुर्यवंशी,पळसपुर बुथप्रमु नागोराव शिंदे, गजानन वानखेडे, विनायक सुर्यवंशी, शेषराव वाडेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा आशा गव्हाणकर,निता नरहिरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हिमायतनगर : युवा सेनेच्या शाखा नामफलकाचे अनावरणप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर. यावेळी तालुक्यातील युवा सेना, शिवसेनेचे पदाधिकारी यांचा सत्कार करुन स्वागत केले आहे