स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेडच्या जनतेला पडली राजाची भुरळ मागीलअडीच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशामक गॅरेजमध्ये धुळीने माखलेल्या अवस्थेमध्ये बंदिस्त असून तो मुक्त करण्यासाठी 22 / 7/ 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ कृती समिती मराठा मावळा संघटना व तालुक्यातील असंख्य शिवभक्त यांनी उमरखेड नगरपरिषद समोर जन आंदोलन केले. त्या जनआंदोलनाचा धसका घेऊन मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांनी एक महिन्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू करतो असं लेखी आश्वासन दिल. परंतु मागील साडेसहा वर्षांपासून अशा प्रकारची खूप लेखी आश्वासन तत्कालीन सत्ताधारी व मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते.पण कोणत्याही प्रकारचं आश्वासन आत्तापर्यंत पूर्ण केलं नव्हतं त्यामुळे यापुढे कुठलीही फसवणूक होऊ नये. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम दिलेल्या तारखेच्या आत पूर्ण व्हावे. या करिता मराठा मावळा संघटना व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती व शहरातील व तालुक्यातील शिवभक्त सर्वांनी मिळून 22 /7/ 2024 पासूनच नगरपरिषद समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुसद येथून बेबीताई तुकाराम राऊत वय 60 वर्ष, सौ मंगला प्रभाकर आलट 70 वर्षअनुसया सखाराम कदम 60 वर्ष सौ साधना खराजी भोजे47 वर्ष, दुर्गाबाई सुखदेव गव्हाणकर65 वर्ष, सौ सिंधुबाई अण्णासाहेब पुसदकर वय वर्ष 70,, सौ संगीता संदीप कदम 35 वर्ष या महिला सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.