आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
मौजे खतगांव,ता.बिलोली येथील सौ.मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यरत विज्ञान विषयाचे सहशिक्षक तथा पर्यवेक्षक आईन्लावर मारोती रामन्ना हे नियत वयोमानानुसार दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा खतगांव संस्थेत त्याच रोजी दुपारी १:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. येथील सहशिक्षक तथा पर्यवेक्षक आईन्लावर मारोती रामन्ना हे मूळचे दरेगांव ताई,ता.देगलूर येथील आहेत.संस्थेत विज्ञान विषयाचे अध्यापक म्हणून ते सन १९९१ सालात रूजू झाले होते.अतिशय अभ्यासू आणि खेळीमेळीत विज्ञान विषयाचे अध्यापन त्यांनी मुलांना केले आहे.त्याच बरोबर संस्थेत पर्यवेक्षक म्हणूनही जबाबदारी नेटाने सांभाळली आहे.त्यांचे असंख्य विद्यार्थी आज विविध विभागात कार्यरत आहेत.एकूण तेहतीस वर्ष आणि सतरा दिवसांची सेवा करून ते आज अभिमानाने सेवानिवृत्त होत आहेत. सदरील सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्यास अध्यक्ष म्हणून श्री.साई शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव बाळासाहेब पाटील खतगांवकर तर प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समिती,बिलोलीचे विद्यमान सभापती रवी पाटील खतगांवकर हे उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी केले आहे.