संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : -बांधकाम कामगार यांच्या ९०दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकसचिव यांनी सह्या करण्यास नकार दिला आहे.सह्या करणे बंद केल्यामुळे बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी थांबली असून तसेच रीनिव करणे सुध्दा बंद पडले आहे.प्रमाणपत्रा वर सचिव यांच्या सह्या नसल्यामुळे शासनाच्या गृह उपयोगी असलेले संच साहित्य बांधकाम कामगार यांना मिळत नाही आहे. शासनाच्या अनेक योजनांपासून कामगारांना वंचित राहावं लागतं आहे.ग्रामसेवक सचिव जबाबदारी घेत नसेल तर इतर अधिकारी यांच्या कडे पदभार द्यावा अशी मागणी उपसरपंच तथा प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रितेश बोबडे व सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकरे यांनी तहसीलदार मेंढे साहेब यांना निवेदन दिले.वनिवेदनातील प्रमुख मागण्या.१)कामगारांना किचन सेट तात्काळ वाटप करावे.३)कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रा करिता ग्रामसेवकांकडून नाहक होणारा त्रास दूर करावा व कामगारांना सह्या द्याव्या.३)कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती तथा इतर योजना तात्काळ देण्यात याव्या.४)पूर्वी ज्यांच्याकडे कामगार कार्ड होते परंतु १ वर्ष अथवा जास्त विलंब झाल्याने ते नूतनीकरण होत नाही ते नूतनीकरण करण्यात यावे.निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येत्या आठवड्या मध्ये आम्ही तहसील कार्यालय समोर आंदोलन करू.असा इशारा रितेश बोबडे, व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष महेश भाऊ ठाकरे यांनी दिला.या वेळी अविनाश आवारी, प्रकाश लढे,अक्षय डुकरे, ठाकरे,कलावती परागे, पपिता पूनवटकर,उषा चवले,मंगला मडावी,सीमा भगत,शालू रंदई, प्रभाताई ठाकरे,दिशा अहिरकर, दुर्गा नेवारे,सचिन ताजने,शुभम नगराळे,अनिरुद्ध मानकर, सूरज बटे व बरेच बांधकाम कामगार लाभार्थी सहकारी उपस्थित होते.