संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर पोलिसांना गेल्या एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या एका आरोपीच्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अतिशय शितापीने पकडून मुसक्या आवळल्या आहेत.सागर उर्फ चिकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) या आरोपीस इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नं. 684/2023 भा.द.वी कलम 307, 324, 504, 506, ॲट्रॉसिटी 3(1), 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल आहेत.सविस्तर माहिती अशी की, गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी चिकास देवकर हा दि. 29 जुलै रोजी रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास काटी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाल्याने लगेच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शक सूचना दिल्या. सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाने काटी गावामध्ये सापळा रचून सदर आरोपीस शितापीने पकडून ताब्यात घेतले आहे.सदरची कामगिरी पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), संजय जाधव (अप्पर पोलीस अधीक्षक), डॉ. सुदर्शन राठोड ( विभागीय अधिकारी बारामती) , सूर्यकांत कोकणे (पोलीस निरीक्षक इंदापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, सहा. फौ. प्रकाश माने, पो.कॉ.गणेश डेरे, पो.कॉ. विशाल चौधर यांनी कामगिरी पार पाडली.