आंनद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधी, रामतीर्थ
खासदार माननीय डॉ. अजितजी गोपछडे साहेब यांची आज दि. 15/07/2024 रोजी नांदेड येथे भेट घेऊन त्यांना मौ.अदमपुर ता.बिलोली जि.नांदेड येथील पुरातन कालीन हेमाडपंथी माहादेव मंदिरासमोर सभामंडप बांधकाम संदर्भात 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपूर्वी आदमपूर येथे श्री माननीय खासदार गोपछडे साहेब आदमपूर येथे आले असता महादेव मंदिर परिसरात सभा मंडप उपलब्ध करून देण्यासंदर्भात निधी देण्याचे शब्द दिले होते. माननीय खासदार साहेबांनी येत्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आदमपूर येथील महादेव मंदिर सभा मंडपसंदर्भात भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले. त्याप्रसंगी भाजपाचे बिलोली तालुकाध्यक्ष श्री चंद्रशेखर पाटील सावळीकर, भाजपाचे जिल्हा सचिव श्री मारोती गंगाधर राहिरे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक श्री.हावगीरावजी गोपछडे, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास आघाडी तालुकाध्यक्ष श्री शिवलिंगराव इबिते सर, श्री चंद्रशेखर विठ्ठलराव पाटील हे उपस्थित होते.


