अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकीतील अवैधध व्यवसायाची बातमी एका दैनिकात काल प्रकाशीत करण्यात आली होती. बातमी मधील काही नावे शहरातील अवैध व्यावसायिकाच्या नावाशी मिळते जुळते होते. आपल्या व्यवसायाशी जोडून नावानिशी बातमी प्रकाशित झाल्याने आपली समाजात बदनामी झाली म्हणून, अंगाचा तीळ पापड करून घेत होते. ढाणकी शहरातील घडामोडी या ग्रुप वर त्या बातमी विषयी चर्चा चालू होती. शहरातील ओम खोपे या वाईन बार मालकाने वेश्यालयातील वेश्या आणी विकल्या गेलेला एक पत्रकार दोन्ही समान आहेत, तरी सुद्धा वेश्येची इज्जत खूप जास्त असते.”असा मजकूर लिहून समाज माध्यमावर प्रकाशीत केला. त्यामुळे सर्व पत्रकारा विषयी अत्यन्त खालच्या शब्दात मजकूर टाकल्याने पत्रकाराच्या भावना दुखावल्या गेल्या. पत्रकारा विषयी अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द लिहील्यामुळे ढाणकी व बंदी भागातील सर्व पत्रकारांनी ओम खोपे याच्या विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार प्रेम केदार यांना निवेदन देऊन, पत्रकाराविषयी अपशब्द लिहणाऱ्या ओम खोपे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. कोणाच्याही दबावाला बळी पडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास, संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. ठाणेदार प्रेम केदार यांना निवेदन देते वेळी ढाणकी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हानंद मुनेश्वर, जिल्हा अध्यक्ष प्रेस संपादक सेवा संघ अनिल राठोड, दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील मांजरे, संस्थापक अध्यक्ष दर्पण पत्रकार संघ संजय सलेवाड, जेष्ठ पत्रकार संजय भोसले, नागेश महाजन, उदय पुंडे , मोहन कळमकर, विनोद गायकवाड , गजानन गांजेवाड , प्रशांत जोशी, स्वप्नील चिकाटे, करण भरणे, दिगांबर शिरडकर, नंदकिशोर जाधव, महेबूब शेख, विलास घोडे, प्रशांत आरेवाड, बंटी फुलकोंडवार, संदेश कांबळे, तेजस तुपेकर, कमलाकर दुलेवाड , प्रवीण जोशी, अशोक गायकवाड कोब्रा, डॉ. दिनेश जयस्वाल, पंजाब भुतनर , सुनील आक्कवार,प्रफुल चौरे, राहुल चौरे, वसंता नरवाडे, भास्कर देवकते यासह इतरही पत्रकार बांधव उपस्थित होते.


