कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
विविध बहुजन संघटने सोबत उप विभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले.दिनांक, 19 जुलै, पुसद. जमाते इस्लामी हिंद, शाखा पुसद तर्फे विशाळगड आणि गजापुर येथे झालेल्या हिंसाचार विरोधात पुसद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. १४ जुलै रोजी कोल्हापूर येथील विशाळगड आणि तजवळच असलेल्या गाजापूर या गावात नियोजनबध्द पद्धतीनें अतिक्रमणाच्या नावाखाली जमावाने मुस्लिम समुदायाच्या घरात घुसून महिलांना, वृध्दांना ,लहान मुलांना मारहाण करून. त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली. तसेच महिलांना,आणि तेथील लोकांना शिवीगाळ करून धमकविण्यात आले.ही घटना अत्यंत निंदनीय असून.पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याला गालबोड ठेवणारी आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील शिव,शाहू,फुले आंबेडकर विचारांच्या सर्वच पुरोगामी संघटना या घटनेचा निषेध करीत आहे. जमाअते इस्लामी हिंद,महाराष्ट्र तर्फे राज्यभरात असे जाहीर निवेदन देऊन निषेध करने सुरू आहे. त्याच पार्श्भूमीवर पुसद येथे विविध बहुजन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जमाअते इस्लामी हिंद तर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की ,या दोन्ही ठिकाणी झालेल्या धार्मिक स्थळाचे नुकसान करणाऱ्यांवर गाजापूर येथील रहवाशांचे आर्थिक नुकसान करणाऱ्याना समाज कंठकांना तात्काळ अटक करावी व शासनाने नुकसान भरपाई करून पिडीत परिवाराला न्याय द्यावा.ज्या समाजकंटकांनी जाळपोळ करून नुकसान केले. त्यांच्यावर युएपीएच्याअंतर्गत कायदेशीर तात्काळ कार्यवाही करावी ही मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी पत्रकार प्रकाश खिल्लारे, रिपाई (आठवले) गटाचे लक्ष्मण कांबळे,दिनेश खांडेकर,बहुजन कार्यकर्ते राजेश ढोले, बाबाराव उबाळे, तसेच मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन शाखा पुसदचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.जमाअते इस्लामी हिंदचे जिल्हा संघटक शेख नईम सर,पुसद शहराध्यक्ष मिर्झा नवेद बेग,शेख इब्राहिम,तारीख अहमद सर,सैय्यद सलमान सर,गफ्फार अतिश सर,ऍड यासिर खान ,तजम्मुल हक,सलीम सर मो.मुदस्सिर,मिर्झा असलम उपस्थित होते. तसेच सदर घटनेबाबात आलेल्या पत्रकारांना विस्तृत माहिती शेख नईम सर आणि सैय्यद सलमान सरांनी दिली.


