कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा मंडळ मध्ये येत असलेल्या मौजे कामोद शिवार,पिंगळी जहागीर, पिंगळी बु. सालवन, रोहीन खिडकी, गुमठी या शिवारात मोठ्या प्रमाणात गुरे,ढोरे,बकऱ्या,हे चारा पाण्यासाठी पहाडात जातात.इतर ठिकाणी त्यांना चारा उपलब्ध होत नाही.या वर्षी मात्र वन विभागाने त्यांना गुरे,ढोरे चरण्यास सक्त मनाई केली आहे.त्यामुळे यांचा चारा पाणी प्रश्न कसा सोडवायचा या साठी येथील रहिवाशी लोकांनी मा.खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना एका निवेदन द्वारे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चराई क्षेत्र बफर मध्ये यांना गुरे ढोरे चारण्यास मंजुरी द्यावे असे नमूद केले आहे.यांना जर चाराच मिळाला नाही तर हे मरण पावतील आणि जनावरांची संख्या कमी होईल हे मात्र खरे.सोनाळा येथील माजी सरपंच राजेश विश्वकर्मा सोबत अनेक शेतकऱ्यांनी वन विभाग कार्यालय यांना विनंतीपूर्वक निवेदन देऊन मा.खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विनवणी केली आहे.


