मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नरसी: अनेकांना आपले वाटणारे मराठवाड्याचे “भगिरथ” जलक्रांतीचे प्रणेते समाजाच्या कार्यावर श्रध्दा असणारे डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या श्रद्धावान निष्ठावान नेत्यांना अभिवादन सभेचे आयोजन संभाजी भिलवंडे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानी करण्यात आले प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,व नंतर उपस्थित लोकांना मिठाई वाटप करण्यात आले यावेळी संभाजी पाटील भिलवंडे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, नायगाव तालुका शिवसेना प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे बालाजीराव भिलवंडे, हिंगोली युवा सेना जिल्हा प्रमुख शिवा शिंदे,जैष्ठ कार्यकर्ते लालबाजी सुर्यवंशी, पत्रकार मारोती सुर्यवंशी संदेश पा.खंडगावकर ,बाबुसाब उच्चेकर , हर्ष भिलवंडे, विश्वजित भिलवंडे, सत्यजित भिलवंडे मिलिंद आढाव यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.