करण्याचे आदेशकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जिल्हाधिकारी यांच्या सह उमरखेड तहसीलदार यांना पत्र
अजीज खान, शहर प्रतिनिधी ढाणकी
उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली व त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता,कावेरी गौतम मुनेश्वर (१५), अवंतिका राहुल पाटील (१४), चेतन देवानंद काळबांडे (१६), सर्व रा.सावळेश्वर, ता.उमरखेड, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सावळेश्वर गावावर शोककळा पसरली होती,या पीडित कुटुंबाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ मानकर यांनी भेट दिली,पीडित कुटुंबातील सदस्यां कडून घटनेची माहिती घेऊन त्यांनी थेट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली व या कुटुंबाला सरकार मार्फत आर्थिक मदत तसेच शुभम काळबांडे या तरुणाने दाखवलेल्या धाडसा बद्दल त्याला शौर्य पुरस्कार मिळाला अशी मागणी केली,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन उमरखेड तहसीलदार व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत,या भेटी दरम्यान मानकर यांच्या सोबत सोबत रिपाई चे सिद्धार्थ बरडे ,ग्रामस्थ चिमनाज़ी काळबांडे,शिवाजी काळबांडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते,


