देवलाल आकोदे, सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
उल्हासनगर : १ मध्ये मोची समाजातील १० वी. व १२ वी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींचा वह्या (रजिस्टर) व पेन देवून गुणगौरव व सत्कार करण्यात आला.तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या नियमित शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना वह्या (रजिस्टर) व पेन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मोची समाजातील दानशूर,सुशिक्षित व समाजाच्या विकासासाठी तळमळ असलेल्या समाजबांधवांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयं प्रेरणेने निधी उभा करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठीचा कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमाचे आयोजक,देणगीदार यांचे विद्यार्थी,पालक व समाजबांधव यांचे मनापासून आभार मानले.समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक विकासासाठी सर्वच समाज बांधवांनी यापुढेही कायम सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक,आयोजक तसेच समाज बांधवांची उपस्थिती होती.








