यवतमाळ मध्ये कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मानले आभार..यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीकडून उमेदवारी न मिळालेल्या माजी खासदार भावना गवळी पाटील यांचे अखेर राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. ११ जागांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती कडून त्या शिवसेने कडून विजयी झाल्या. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. अशातच भावना गवळी यांचा विजय होताच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरातील शिवसेना नेते मा.राजन मुखरे यांच्या घरा जवळ फटाके व आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यामध्ये शिवसेना नेते मा.राजन मुखरे, तालुकाप्रमुख संजय सिंह बयास, शहर प्रमुख दीपक उखळकर, शहर संघटक अनिल चव्हाण पाटील .जिल्हा ओबीसी संघटक लक्ष्मण आगाशे, व्यापारी संघटक संदीप लापसेटवार, उपशहर संघटक गजेंद्र मडके, अजय संगई, संजय तोंडारे, भारत मोदीराज महामुनी, अमर सोनटक्के, तेजस कानेड, श्याम ठाकुर, विशाल पेन्शनवार,युवराज जोशी,सौरभ चव्हाण पाटील, आदित्य शिंदे,यांचे सह शेकडो कार्यकर्ते या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते.माजी खासदार गवळी पाटील यांनी सलग पाच टर्म यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. खासदार म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया दरम्यान त्यांची राजकीय हालचालीतून उमेदवारी कट झाली होती. मेरी झाशी नही दूंगी असे म्हणत त्यांनी सुरुवातीपासूनच उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठीकडे आग्रह धरला होता. मात्र सर्वेक्षणाचे कारण पुढे करून त्यांची यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी महायुतीतील शिवसेनेने हिंगोली उमरखेडचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना दिली त्यानंतर भावना गवळी पाटील. नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळतील प्रचार सभेत गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे पुनर्वसन केले जाईल असा शब्द दिला होता. त्यानुसार विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक घोषित होतात माजी खासदार भावना गवळी .पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी जाहीर केली. शुक्रवारी पार पडलेल्या या निवडणुकीत भावना गवळी विजय झाल्या असून आगामी काही दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामूळे माजी खासदार भावना गवळी विधान परिषदेवर विजयी होताच यवतमाळ शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला..