स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शेतकरी कुटुंबातील जन्म. मुलाने अधिकारी व्हावे, ही वडिलांची इच्छा. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कु. मयूर बाळासाहेब मांदळे याने युक्रेन येथील मॅरी स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एम बी बी एस परीक्षा पास झाले.मयूर मांदळे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे येथील मांदलवाडी हे गाव. एका शेतकरी कुटुंबातील जन्म. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम. पण, आपल्या मुलाने उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर बनावे, अशी आई वडिलांची इच्छा. यासाठी आईवडिलांनी अथक परिश्रम करून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. मयूर मांदळे यालाही आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव तर होतीच, शिवाय पैशांची बचत करण्याबरोबरच काटकसर हा गुण अंगीकारला होता. त्यांना यामागे होती परिस्थितीची जाणीव. पण, ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत आणि अभ्यास करून यश खेचून आणले आहे. गोरगरीब जनतेची मनापासून सेवा करणार असून माझे शिक्षण पूर्ण करण्यात माझे चुलते पांडुरंग मांदळे यांचाही मोठा वाटा असल्याचे या वेळी आवर्जून मयूरने सांगितले.त्याच्या या कामगिरीबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे


