सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मशिन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व झालेला भ्रष्टाचारप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांनी रणशिंग फुंकले असुन १६ जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला. आंदोलनात १० हजार पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जलजीवन मशिन मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्या लोकसभेत मांडणारं आहे अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अँड गोवाल पाडवी यांनी केले आहे.


