मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद मधील वेरूळ सभागृह येथे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत सन २०२३,२४ या वर्षात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल तीन विविध पुरस्काराने बिडकीन ग्रामीण रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले, या रुग्णालयाने कुटुंब कल्याणच्या नियोजन प्रक्रियेमध्ये प्रथम क्रमांक देण्यात आले, रुग्णालय बिडकीनला पी पी आय यु सी डी कॉपर टी या कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच ए एन टी ए आर ए अंतरा या कार्यक्रमासाठी प्रथम क्रमांक आले छत्रपती मीना, डॉ जिल्हाप्राप्त झाले वरील तिन ही कार्यक्रमांमध्ये ग्रामीण रुग्णालय बिडकीन यांनी प्रथम कार्य केल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजी नगर विकास जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी जिल्हापरिषद, आरोग्य उपसंचालक डॉ रामटेके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मोतीपवळे, या मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिता मात्रे, अधिपरीचारिका वर्षा शेजुळ, प्रभा कोटापुरम कविता नेटके, यांना प्रशस्तिपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.