संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी प्रेरणा संस्था तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या वतीने घाटंजी येथील इरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे रोगनिदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात दोन हजार ८३७ रुग्णांची तपासणी करून औषधी उपचार करण्यात आले. तसेच ३९८ रुग्णांना शस्त्रक्रिया तथा पुढील उपचाराकरिता सावंगी मेघे येथे नेण्यात येणार आहे.या शिबिराचे उद्घाटन लोकनेते माजी आ. अण्णासाहेब पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवन राठोड या कलाकारांनी त्यांची हुबे हुब रांगोळीतून छायाचित्र रेखाटले होते. याप्रसंगी माजी आ. अण्णासाहेब पारवेकर यांनी समाजकारणात राजकारणात सेवा करण्याचे वृत्ती असणारे लोक खूप कमी होत असतानाही डॉ. विष्णू उकंडे यांनी घाटंजी तालुक्यातील रुग्णासाठी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असल्याचे आश्वासित केले. याप्रसंगी राजूदास जाधव,घाटंजीत प्रेरणा संस्थेचा पुढाकार शैलेश ठाकूर, आकाश राठोड, राम खांडरे, मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार,पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित, इरा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष वामन राठोड,भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश डहाके,राजेंद्र जाधव, नीलेश चव्हाण,वसंत मोरे,भरत पोतराजे, अंकुश ठाकरे, नंदकिशोर डंभारे,मनोज राठोड,चंद्रप्रकाश खरतडे,वासुदेव राठोड, तथा वंदना राठोड, मुज्जू पटेल उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. विष्णु उकंडे यांनी केले. संचालन आकाश राठोड यांनी केले तर आभार मयुरी राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप राठोड, अमृत नेवारे, शैलेश कनोजे, गणेश राठोड, राजू धुर्वे, संदेश तोवर, महेंद्र राठोड, पवन अळसपुरे, अभय राठोड, खुशाल पवार, निकेश जाधव, जगदिश खोडे, प्रवीण मातारमारे, सुदर्शन आत्राम, निखिल मुनेश्वर, पवन चव्हाण, विकास पवार, निखिल ढवळे, शैलेश राठोड, संतोष घोगेवाड, विक्रम राठोड,मोतेवार, विजय नेवारे यांनी प्रयत्न केले.