कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदूरबार: तळोदा येथील स्वातंत्र्यसेनानी प्राचार्य भाईसाहेब गो.हू.महाजन न्यू हायस्कूल ,श्री शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले प्रणित श्री सुपडू वना माळी प्राथमिक विद्यामंदिर व प्रि.भाईसाहेब जी.एच.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज दि.६ जुलै २०२४ रोजी अध्यापक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. प्राचार्य भाईसाहेब गो.हू.महाजन यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे तालुक्याचे आमदार मा. राजेशदादा पाडवी तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ.मंगलाताई अरुण कुमार महाजन,संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्टचे सदस्य श्री.अरुण कुमार महाजन, कॉलेज ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.सुधीरकुमार माळी, तसेच कॉलेज ट्रस्टचे इतर सदस्य ही उपस्थित होते. यांनी बाबाजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण व गुलाब पुष्प अर्पण केले व अभिवादन केले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य अमरदीप अरुणकुमार महाजन, माजी प्राचार्य श्री ए एच टवाळे सर,इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या सौ. शितलताई महाजन मॅडम मराठी मिडीयम च्या मुख्याध्यापीका सौ.वंदना माळी मॅडम यांनी देखील बाबाजींना अभिवादन केले. याप्रसंगी शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आके होते. निबंध स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्राथमिक विद्यामंदिरात वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.साहेबराव खैरनार सर, पर्यवेक्षक श्री.ए.एल.महाजन सर, पर्यवेक्षक श्री.ए .आर सूर्यवंशी सर कार्यालयीन अधीक्षक श्री.डी.पी महाले भाऊसाहेब तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.