राहुल दुगावकर,तालुका प्रतिनिधी, बिलोली
दिनांक एक जुलै रोजी माननीय विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड प्रदीप चव्हाण, माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पेड मा के नाम’ वन महोत्सव अंतर्गत अर्जापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जापूर वृक्ष लागवडी बाबत वृक्षदिंडी काढून पानसरे स्मारक मध्ये वृक्षारोपण करून वन महोत्सव साजरा करण्यात आला व गावातील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थयांना वृक्ष लागवडी बाबत माहिती सांगण्यात आली. या पावसाळ्यात एक वृक्ष आपल्या आईच्या नावावर लावण्यात यावे ‘एक पेड मा के नाम’ बाबत जनजागृती करण्यात आली सदरील कार्यक्रमाला सरपंच सिद्धार्थ पतंगे उपसरपंच बाबा पटेल प्रा. डॉ. मोहसीन खान सर, मुख्याध्यापक सलीम सर व सर्व शिक्षक वृंद वनपाल मसियोदिन काजी, वनपाल फरीद शेख, वनरक्षक सय्यद फयाज, वनरक्षक मुसळे, वनरक्षक गायकवाड मॅडम, वनरक्षक मजरे मॅडम तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.