प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
कोल्हापूर :-मागणी नसताना अनेक प्रकल्प कार्पोरेट लॉबीचा फायदा करण्यासाठी विकासाच्या नावावर कार्यरत होताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्ग व स्मार्ट प्रीपेड मीटर योजना राबवणे साठी कार्पोरेट शक्ती व त्यांना मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणा व सत्तेमधील काही लोकप्रतिनिधींचे हात सरसावत आहेत. निव्वळ सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट करणे असे एकमेव उद्दिस्ट घेऊन या कार्पोरेट कंपन्या सर्वसामान्य जनतेला लुटत आहेत. याला विरोध करणेसाठी शक्तीपीठ महामार्ग तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर कायमचे हद्दपार करण्यासाठी मेकॅनिकल अॅण्ड इंजिनिअरिंग कामगार युनियन व सर्व श्रमिक संघ, कोल्हापूरचे वतीने कोल्हापूर इचलकरंजी,आजरा,गडहिंग्लज, राधानगरी येथे धरणे आंदोलन करणार असे संघटनेचे अध्यक्ष काँ.अतुल दिघे,कॉ.प्रकाश कांबरे,कॉ.सुनिल बारवाडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.शक्तिपीठ महामार्ग गोवा ते नागपूर सर्वसाधारण ८०० किलोमीटर लांबीचा ८६००० कोटी रुपये खर्चून मागणी नसताना लादला जात आहे. या शक्तीपीठ महामार्गामुळे कोणाचाही फायदा होणार नाही. असे असताना महाराष्ट्र शासन कार्पोरेट कंपन्यांचा फायदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत आहे. हजारो एकर जमीनी, कोट्यावधी झाडाच्या कतली,अनेक कालवे, विहिरी, पाण्याच्या कुपनलिका, पाण्याचे झरे अशी नैसर्गिक हानी,पर्यावरणाची हानी फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच जंगली प्राण्यांचा उपद्रव या मार्गामुळे जंगल लगतचे नागरिकांना शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे. हा रस्ता बड्या भांडवलदारांच्या भांडवलदार व्यापारी करताच असणार आहे. नाव देवाचे रस्ता भांडवलदारांचा असा याचा अर्थ आहे. हजारो एकर जमिनीचे अधिकरण करून सरकार हा मार्ग पुढे रेटत आहे. त्यास नागरिकांचा, शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. सरकारणे तूर्तास या शक्तीपीठ मार्गाला स्थगिती दिलेली आहे. महावितरण कंपनी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर मोफत देणार म्हणून जाहिरात करीत आहे. सद्यस्थितीत जे स्मार्ट मीटर आहे याबाबत विज ग्राहकांची कोणतीही तक्रार नाही. निव्वळ कॉर्पोरेट कंपन्याचे फायदा होणे करता स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा घाट सरकार घालत आहे.सरकार मधील काही लोक प्रतिनिधी, कॉर्पोरेट कंपन्या,शाशकीय अधिकारी सर्व मिळून ग्राहकांच्या नावावर कर्जाचा बोजा टाकून लुटीचा प्रकार चालू केला आहे. तो पूर्णतः चुकीचा बेकायदेशीर आहे .स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये अनेक त्रुटी आहेत, स्मार्ट पीटर प्रीपेड मीटरचा दर बाजारातील मीटर पेक्षा दुप्पट दराने ग्राहकांच्या माठी मारला जात आहे.ग्राहकांचा तोटाच होणार आहे. वारंवार मीटर्स जम्पिंग होत आहेत त्यामुळे बिले दुप्पट तिप्पट येत आहेत, रिचार्ज वेळेत होत नाही, तांत्रिक बिघाड होते, अनेक ग्राहकांची वीज सेवा २४/४८ तासा पेक्षा जास्त काळ बंद पडत आहेत,तसेच मीटर बंद पडले,जळाले तर उपाय काय याचे उत्तर महावितरण कडे नाही.अशा अनेक कारणामुळे चालू असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटर सेवा अन्य राज्या मध्ये बंद करत आहेत, गुजरात, हरियाणा,राजस्थान राज्य मध्ये संघर्ष चालू असून पोस्टपेड सेवा संघर्ष करून चालू ठेवत आहेत.महावितरण कंपनीत मीटर रिडींग घेणारे,मिटर रिडर्स, विज बिल प्रणाली सांभाळणारे बिलिंग विभागातील सर्व कर्मचारी विजेची देयके घेणारे,वीज बिलाचे वाटप करणारे,वीज बिल वसुली करणारे,वीज खंडित करणारे,खंडित वीज पुरवठा सुरू करणारे,मीटर टेस्टिंग करणारे,फ्युज कॉल अटेंड करणारे,आणि खाजगी कॅश कलेक्शन सेंटर्स वर काम करणारे सर्व कॅश कलेक्टर्स या सर्व सेवा देणारे किमान २०००० च्या वर कर्मचारी या योजनेमुळे बेकार/बेरोजगार होणार आहेत.जो पर्यंत हा शक्ती पीठ महामार्ग तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर कायमचे रद्द करीत नाहीत तो पर्यंत हा संघर्ष चालूच राहणार इतकेच नव्हे तर कार्पोरेट लुटीच्या विरुद्ध जनतेने जागे राहणे गरजेचे आहे असे अहवान काँ.अतुल दिघे,कॉ.प्रकाश कांबरे, कॉ.सुनिल बारवाडे यांनी केले आहे.पत्रकार परीषदेला प्रकाश जाधव,कॉ.अनंत कुलकर्णी,नारायण मिरजकर,रजनी पाटील, राजकुमार जाधव, आण्णासो पोवार, बाळकृष्ण करळे, उदय पाटील, संजय गावडे, रविंद्र कांबरे,दत्ता पाटील, वासीम शेख,विश्वास चौगुले, नरेंद्र मोरे, आनंदा कांबळे,उत्तम माने, अमोल पाटील, संजय खोराटे, सुधिर हिलगे, उद्धव पाटील,अनिल माळी, रविंद्र वंडकर,एस.के.पाटील उपस्तीत होते.