स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील संयुक्त पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर गंभीर गुन्हे दाखल करण्यास. उमरखेड ठाणेदार सोळंके यांची टाळाटाळ आरोपींना अभय देणाऱ्या ठाणेदार सोळंके व एपीआय. सरदार यांची तात्काळ बदली करा. अशी शेख इरफान यांची मागणी शेख इरफान यांच्यावर त्यांच्या वाढदिवस साजरा करीत असताना. आरोपींनी हल्ला करून शेख इरफान यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यांना डोक्याला टाके लागले आहेत अशा गंभीर प्रकरणाच्या हल्लेखोरावर उमरखेड पोलिसांनी किरकोळ गुन्हे लावून. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. असा आरोप संपादक इरफान शेख यांनी पोलिसावर केला आहे. ठाणेदार सोळंके व उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीवर जुन्या कायद्याप्रमाणे ३०७,११० एलसीबी तसेच पत्रकार संरक्षण कायद्याखाली व एमपीडी नुसार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे असे संपादक इरफान यांचे म्हणणे आहे. मला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण मागे घेण्यात येणार नाही. असे शेख इरफान यांचे म्हणणे आहे.











