आनंद मनवर तालुका प्रतिनिधी सुधागड
सुधागड : येथील को. ए. सो. गावंड विद्यालयात दिनांक 27 जून रोजी शाळेत इयत्ता 8 वीला शिकणाऱ्या मुलींना त्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी,मुलींनी जास्तीत जास्त शाळेत उपस्थित राहण्यासाठी शाळेची गोडी लागण्यासाठी दर वर्षी इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल मिळते. ज्या मुली शाळेत1 ते 2 किंवा त्या पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावरून शाळेत प्रवास करतात त्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. शासनाच्या मानवविकास योजने मुळे मुलींचा शिक्षणा कडे कल वाढतो आणि मुली स्वयम पूर्ण होऊन शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास त्यांचा होतो. हेच शासनाच्या या योजनेचे उदात्त धोरण आहे .सदर सायकल वाटप शाळेचे चेअरमन श्री. ऍड. प्रवीणभाई कुंभार,प्रमुख पाहुणे माजी. मुख्याध्यापक श्री. नवगिरे सर केंद्रप्रमुख श्री. हाके साहेब, समाजसेवक श्री. सुनीलजी वाघोस्कर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बिपीन पाटील सर यांचा हस्ते विध्यार्थिनींना करण्यात आले. सदर प्रसंगी शाळेतील सर्व जेष्ठ शिक्षक, शिक्षिका, पालक, विध्यार्थी,सेवकवृंद यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)