इम्रान सय्यद तालुका प्रतिनिधी उमरगा
मुरूम शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक सईद अहमद हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी सत्कार करून भेटवस्तू देत निरोप देण्यात आले डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सईद अहमद यांच्या सेवानिवृत्ती दिनी व तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम शिक्षकांच्या वतीने 29 जून रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमीर शिकलगर होते शिक्षकांच्या वतीने यांचा सपत्नीक सत्कार करून भेटवस्तू देण्यात आले शाळेत इयत्ता दहावी प्रथम ,द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सईद अहमद यांनी शाळेत अविरतपणे 31 वर्ष इमाने इतबारे सेवा बजावली असल्याचे सांगून त्यांची सेवा अविस्मरणीय राहील असे सांगितले यावेळी सईद अहमद यांनी आपल्या कारकिर्दी बाबत मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जुबेर अत्तार यांनी तर आभार श्रीमती खतीब खुतेजा बेगम यांनी मानले कार्यक्रमास प्राथमिक चे मुख्याध्यापिका रुबाब बी अत्तार सहशिक्षक दुल्हा सगरी, शहाजहा पटेल , नूर अहेमद काणकुर्ती , इम्तियाज जमादार, बांगी , श्रीमती जैनब बी कुरेशी , सना बाबुडे , जोहर पाशा शेख , विजय कांबळे, महेबूब जमादार, राहिल सय्यद आदि उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)