सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा, ता.२३- साकोरी येथील एका महिलेस तिच्या गावातील तीन युवकांनी सतत फोन कॉल करून आणि इन्स्टाग्राम वरून मेसेज करून मानसिक छळ केल्याप्रकरणी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाणे येथे तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहीती अशी की साकोरी(ता.जुन्नर)येथील साक्षी बजरंग साळवे (साक्षी अक्षय गाढवे लग्नानंतरचे नाव) या मुलीचे लग्न झालेले आहे हे माहिती असूनही साकोरी गावातील तीन युवक नामे अभिषेक सुदाम पानसरे, अभिषेक अशोक गोल्हार, मयूर बाजीराव मुळे (सर्व रा.साकोरी, ता .जुन्नर जि .पुणे) यांनी सदर महिलेला सतत फोन करून आणि इन्स्टाग्राम वर मेसेज करून मानसिक छळ केला व त्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून सदर तिघांविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाणे येथे भा.द.वि.कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रागिणी कराळे या करत आहेत.