अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकूलासाठी अवैध रेती तस्कराकडून ज्यादा दराने रेती विक्री करण्यात येत असल्याचे व त्यांना त्यांच्या मिळकती च्या आवाक्या च्या पलीकडे असल्याच्या निर्देशानात येताच जिल्हा ग्रामिण विकास यंत्रनेने घरकूलचे बांधकामाकरीता वाळूची मागणी केल्यानुसार, जिल्हा वाळू सनियंत्रण समिती यांचे निर्देशांने, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकूलाच्या बांधकाम आराखड्यात निश्चित केलेल्या वाळू परिमाणानानुसार, नमूद असलेल्या तरतुदीनुसार जिल्हा वाळू सनियंत्रण समितीचे दिनांक १६ मे २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे निर्णय घेऊन दिनांक २०मे २०२४ ते ०६जून २०२४ पर्यंत जिल्हयातील कार्यान्वित असलेल्या वाळूडेपो मधून फक्त घरकूल लाभार्थ्याकरीता जास्तीत जास्त ५ ब्रास पर्यंत अथवा महाखनिज प्रणालीद्वारे वाळू बुकींगची सुविधा उपलब्ध करून . घरकूल लाभार्थ्यांची यादी संबंधित गटविकास अधिकारी यांनी संबंधित तहसिलदार यांना उपलब्ध करून , संबंधित यंत्रणांना यांना सूचना देऊन, फक्त घरकूल लाभार्थ्यांकरीता जास्तीत जास्त ५ ब्रास पर्यंत महाखनिज प्रणालीद्वारे वाळू बुकींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाहतूकीचा खर्च ग्राहकांना करावा लागणार असून . अशा स्पष्ट सुचना जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणा, जि.प. यवतमाळ यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांना द्याव्या.घरकूल लाभार्थ्यांना वाळूडेपोधून बुकींगद्वारे वाळू उपलब्ध होणे करीता वाळूडेपो मध्ये वाळूसाठा असणे आवश्यक आहे, त्याकरीता संबंधित तहसिलदार यांनी वाळूडेपोधारकांकडून मंजुर परिमाणानुसार उचल करण्यासाठी शिल्लक असलेल्या साठयानुसार प्रतिदीन डेपोमध्ये साठा करून देणे गरजेचे आहे .