अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे नियमित पणे नियुक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती मुनेश्वर ह्यांच्या दिनांक २१/०४/२०२४ ते ०५/०५/२०२४ ह्या कालावधी करिता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ ह्यांचे अनुमोदित नस्ती अनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र सोनदाभी येथील द्वितीय वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत डॉ.संदीप हांडे ह्यांना देण्यात आलेले तात्पुरत्या आदेश संपुष्टात येऊनही त्यावर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.धम्मपाल मुनेश्वर स्वमनानेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा विस्कळित करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमित वैद्यकीय अधिकारी रजेवर जात असल्यास त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून त्या पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात इतर उपलब्ध वैद्यकीय अधिकारी ह्यांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या परवानगीने तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येतो हा एक प्रशासकीय भाग असून त्या जागेवरील नियमित अधिकारी आपल्या कर्तव्यावर रुजू होताच तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेले आदेश संपुष्टात येतात ही बाब डॉ.धम्मपाल मुनेश्वर ह्यांना अवगत असूनही केवळ महिला अधिकाऱ्याचे शोषण करण्याच्या उद्देशाने डॉ. धम्मपाल मुनेश्वर संपुष्टात आलेल्या आदेशाचा गैरवापर करत आहेत.डॉ.धम्मपाल मुनेश्वर हे तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी असून नेहमीच चर्चेत असतात,कधी आशा सेविकांच्या मानधन,कामाच्या आधारे देण्यात येणाऱ्या मोबदला अदा न केल्यामुळे तर कधी, नांदेडवरून तालुक्याचे आरोग्य प्रशासन सांभाळत असल्याच्या बाबीमुळे.डॉ.स्वाती मुनेश्वर दिनांक २७/०४/२०२४ रोजीच आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून प्राप्त झाली.डॉ.स्वाती मुनेश्वर ह्या ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियमित अधिकारी असून त्या कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर त्यांचा तात्पुरता पदभार देण्यात आलेला आदेश आपोआपच संपुष्टात येतो त्यासाठी नवीन आदेशांची गरज नसते अशी बाब कार्यालयातून समजली.डॉ.संदीप हांडे व डॉ.धम्मपाल मुनेश्वर ह्यांना सुद्धा तशी बाब अवगत आहे व कार्यालयातून सुद्धा त्यांना तसे मार्गदर्शन दिले आहे तरी तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धम्मपाल मुनेश्वर हे ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियमित वैद्यकीय अधिकारी ह्यांच्या स्वाक्षरीने कोणतेच अहवाल त्यांचे कार्यालयात स्वीकारत नसल्यामुळे ढाणकी आरोग्य केंद्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियमित वैद्यकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना नांदेडवरून ये जा करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धम्मपाल मुनेश्वर व डॉ.संदीप हांडे हे ढाणकी येथे जनतेची दिशाभूल करत असून त्याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी व तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या आदेशाचा गैरवापर करून तालुक्यातील सर्वात मोठ्या आरोग्य केंद्राचा कारभार विस्कळीत करणाऱ्या डॉ.धम्मपाल मुनेश्वर ह्यांचेवर कार्यवाहीची मागणी जनतेतून होत आहे.