सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणात आंघोळीसाठी गेलेल्या दोघी अल्पवयीन मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडुन मुत्यू झाल्याची घटना घडली आहे या मुलींचे मूतदेह काढुन शवविच्छेदन करून नातेवाईकांना सपविण्यात आला. नवापुर तालुक्यातील बेडकी गावातील उज्वला जंयत्या गावित (१६) मिखा सानु गावित (१७) या दोन्ही मैत्रीणी गावाजवळ असलेल्या बोरपाडा धरणात दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी आंघोळीसाठी गेल्या होत्या किनाऱ्यांवर आंघोळ करताना पाय घसरल्याने दोघी धरणाच्या खोल पाण्यात गेल्याने दोघांचा बुडुन मुत्यू झाला. याबाबत माहिती मिळतात गावकऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने धरणातुन मूतदेह बाहेर काढला दोघा मुलीच्या मूत्युमुळे बेडकी गावांत शोककळा पसरली परीवाराच्या सदस्यांनी एकच आक्रश केला दोन्ही मयत मुलीच्या विसवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.








